• Total Visitor ( 134084 )

कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाचा उल्हास मेळावा उत्साहात संपन्न!

Raju tapal January 11, 2025 98

कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाचा उल्हास मेळावा उत्साहात संपन्न!

नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाचा उल्हास मेळावा अभिनव विद्यालय,पारनाका, कल्याण ( प.) येथे प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत काल संपन्न  झाला. या मेळाव्याची सुरवात  दीप प्रज्वलनाने झाली या मेळाव्यास  महानगरपालिका शिक्षण विभागातील 21 सीआरसींचे दिलेल्या विषयानुसार स्टॉल लावण्यात आलेले होते आणि या ठिकाणी साक्षरता अभियानाचे अतिशय सुंदर साहित्य  प्रदर्शित करण्यात आलेले होते. या उल्हास मेळाव्यामध्ये  21 सीआरसी प्रमुख, मुख्याध्यापक, सहा.शिक्षक, विद्यार्थी, समग्र शिक्षा अभियान च्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव,अभिनय विद्यालयाचे मुख्याध्यापक संपत गीते तसेच विषयतज्ञ चंद्रमणी सरदार, तंत्रस्नेही शिक्षक विलास लिखार,शिक्षण विभागाचा इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी नवसाक्षर,असाक्षर आणि त्यांचे स्वयंसेवक यांनी देखील त्यांचे मनोगत यावेळी व्यक्त केले. 
या मेळाव्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, त्यामध्ये सर्व सीआरसी मधून साक्षरतेवर आधारित पथनाट्य तसेच गीत, तसेच जनजागृतीपर नाटिका सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ शेप विषयतज्ञ यांनी केले. संतोष पाटील,विषयतज्ञ यांनी आभार प्रदर्शन केले, या उल्हास मेळाव्याचे व्यवस्थापन हे  समग्र शिक्षा अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी केले.
या कार्यक्रमाचा उद्देश महानगरपालिका क्षेत्रात साक्षरतेविषयी जनजागृती होणे हा होता. खूप उत्साहवर्धक आणि आनंदी वातावरणामध्ये हा उल्हास मेळावा संपन्न झाला.     
या नवभारत साक्षरता उल्हास मेळाव्याचे आयोजनासाठी प्रशासनाधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांचे मार्गदर्शन लाभले.

Share This

titwala-news

Advertisement