उदया शिवजयंती असुन उद्या कोर्टाला सुट्टी असल्यामुळे
आज कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या बाररूममध्ये शिवजयंती जन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला .
यावेळी सर्वप्रथम वरिष्ठ अॅडव्होकेट पेश इमाम साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन शिवाजी महाराजांचे गुणवैशिष्टय़े विषद केले .यानंतर सीनियर अॅडवोकेट किरण काकडे साहेब यांनी कथा -कथनाच्या माध्यमातून मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कसे घडविले या विषयी रसाळवाणीने माहिती दिली .
वरिष्ठ अॅडव्होकेट शिवाजी राजोळे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व विशद केले.
तर वरिष्ठ अॅडव्होकेट चंद्रलेखा बेनके मॅडम यांनी शिवाजी महाराजांचे गुणवैशिष्टय़े आत्ताच्या परिस्थितीत आपण आचरणात आणले पाहिजेत .सध्याचे सध्याची परिस्थिती अतिशय भयंकर असुन जाती जातीत धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे उदाहरण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये प्रशासनामध्ये सर्व जाती धर्माचे, पंथाचे लोक एकत्रित येऊन स्वराज्यासाठी झटत होते. स्वराज्य निर्मितीत सर्व जातीधर्मीयांचे मोलाचं कार्य होते .छत्रपती शिवाजी महाराजांचे एकवीस अंगरक्षक असताना त्यातील तेरा अंगरक्षक हे मुस्लीम समाजाचे होते याचे उदाहरण देऊन शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील मुस्लिम बांधव जिवाला जीव देण्यास तयार होते हे विविध दाखल्यातून दाखवून दिले . शत्रू मेला की त्याचे वैर संपते हे अफजल खानाच्या वधानंतर अफजलखानाची समाधी बांधली, यावरून शिवाजी महाराजांचे औदार्य दाखवून दिले .
यानंतर अॅडव्होकेट पंकज जाधव यांनी बहुजनांनी आता तरी जागृत झाले पाहिजे शिक्षित झाले पाहिजे हा संदेश त्यांच्या भाषणातून दिला .
अॅडव्होकेट स्वप्नील साटम यांनी शिवाजी महाराजांच्या काळात लावणी कशी उदयाला आली लावणी म्हणजे तमाशातली लावणी नसून शेतीतील लावणी किती महत्त्वाचे होते हे विशेष करून तृतीयपंथीयांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्वराज्यासाठी कशा भूमिका निभावल्या याविषयी विचार प्रकट केले .
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट डॉ सुनील भालेराव यांनी महापुरुषांच्या नुसत्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरे करत असतांनाच महापुरुषांचे विचार आपल्या आचरणात आणणे महत्त्वाचे ठरेल , कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांच्या पुढ्यात जेव्हा आपल्या सैनिकांनी आणून उभी केली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळीचा आहेर देऊन तिला सुखरूप घरी पोहोचवले परंतु आजची परिस्थिती अतिशय भयानक आहे निर्भया खटल्यातील निर्भया ची बाजू मांडणार्या महीला अॅडव्होकेट सीमा कुशवहा यांच्यावर आज हल्ला होतो ही शरमेची बाब आहे .म्हणून जेथे जेथे महिलांवर अन्याय अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी वकीलांनी धावून जाणे अत्यावश्यक आहे ,असा संदेश त्यांनी त्यांच्या भाषणातून दिला . अशी माहिती
ॲड.प्रकाश जगताप यांनी दिली