• Total Visitor ( 84547 )

कल्याणमध्ये प्रशांत देशमुख हस्तकांची गुंडगिरी

Raju Tapal May 20, 2022 33

कल्याणमध्ये परशा देशमुख हस्तकांची गुंडगिरी
पार्सलसाठी हॉटेलमध्ये राडा
कल्याण-रात्री हॉटेल बंद असताना जबरदस्तीने पार्सल मागितले. हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने पार्सल मिळणार नाही. हॉटेल बंद आहे. परत जा असे सांगितले. तेव्हा संतप्त तिघांनी सुरक्षा रक्षकाला चाकूने भोसकून बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. मारहाण करणा:या कुख्यात प्रशांत देशमुख उर्फ पीडी याच्या नावाने दमबाजी करीत होती. गुंडागिरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
कल्याण पश्चिमेतील नामांकीत पॅराडाईज हॉटेल आहे. रात्री एक वाजताच्या सुमारास हॉटेल बंद झाले होते. तीन जण हॉटेलसमोर पार्सल घेण्यासाठी आले. सुरक्षा रक्षकाने स्पष्ट सांगितले. किचन बंद झाले आहे. पार्सल मिळणार नाही. तिघांनी सांगितले की, आम्ही प्रशांत देशमुखचे पोरे आहोत. तुला पार्सल द्यावेच लागेल. तिघांनी वाद घालत सुरक्षा रक्षकाला मारहाण सुरु केली. सुरक्षा रक्षक महेश गुप्ता याला चाकू भोसकून बेदम मारहाण केली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. मारहाण करणा:या तिघांना लोकांनी सुद्धा चोप दिला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे. कल्याणमध्ये प्रशांत देशमुख यांच्या हस्तकांची गुंडागिरी समोर आली आहे.

Share This

titwala-news

Advertisement