MENU
  • Total Visitor ( 136291 )

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज टॉवर बदल मिळणार ज्यादा मोबदला

Raju Tapal October 15, 2022 45

केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने वीज टॉवर बद्दल शेतकऱ्यांना ज्यादा मोबदला
राजू टपाल.
टिटवाळा :- भिवंडी लोखसभा मतदार संघातील कल्याण तालुक्यातील टॉवर लाईनमध्ये ११ गावच्या बाधित जमीन मालक व  शेतकऱ्यांना आता बाजार भावाच्या सरासरीने ज्यादा मोबदला मिळणार आहे केंद्रीय मंत्री पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प मोबदल्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. त्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल केंद्रिय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.                        महावितरणच्या पडघा ते खारघर या दरम्यान मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड या प्रकल्पात 20 किलोमीटर च्या जागेत तब्बल 55 टॉवर उभारण्यात येणार असून या स्टर लाईट टॉवर लाईन मध्ये कल्याण तालुक्यातील ११ गावे बाधित होत आहेत. यामध्ये 6 किलोमीटर जागेत वनविभागाची जागा असून त्यात 17 टॉवर तर 14 किलोमीटर खाजगी जागेत 38 टॉवर उभारण्यात येणार आहेत. सदरील टॉवर हे पोई,चवरे,नावगाव, बापस ई, म्हसकळ, आडीवली,फळेगाव,नडगांव,दानबाव, वावेघर, वाळकस या गावांमधून जात आहे. सदर बाधित शेतकऱ्यांना विद्युत कंपनी अगदी तुटपुंजा मोबदला देऊन जमिनी लाटण्याचा प्रयत्न करत होते. अनेक वेळा बाधित शेतकरी व ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देऊन ही कंपनी काही दाद देत नव्हती अखेर सर्व शेतकरी हे सामाजिक कार्यकर्ते मधुकर मोहपे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली असता केंद्रीय मंत्र्यांनी त्वरित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प मोबदल्याबद्दल चर्चा करून नुकसान भरपाईतील तफावतीबद्दल निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते.
सदर प्रकरणी राज्य सरकारने वीज मनोरे आणि पारेशन वाहिन्यांच्या जागेसाठी सुधारित धोरण राबविण्याचा निर्णय घेऊन  शेतकऱ्यांना भरघोस मोबदला देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार त्या परसरातील गेल्या ३ वर्षातील खरेदी विक्री व्यवहाराच्या दराचा सरासरी दर ग्राह्य धरून त्या सरासरी दराचा दुप्पट मोबदला आता शेतकरी व जमीन मालकाला मिळणार आहे. तर तारेखलील जमिनीसाठी एकूण ३० टक्के मोबदला दिला जाईल. सदर निर्णयाची कल्याण तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात अमलबजावठी करण्यात येणार आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या या प्रश्नावर केंद्रिय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नातून राज्य भरातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून शेतकऱ्यांकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहे.

Share This

titwala-news

Advertisement