कल्याणच्या ग्रामीण भागात अनेक गावात फेरीवाल्यांना प्रवेश बंदी
Raju Tapal
September 25, 2022
33
कल्याणच्या ग्रामीण भागात अनेक गावात फेरीवाल्यांना प्रवेश बंदी
लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामपंचायतचा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांना पळवून नेत असल्याचे व्हिडीओ, बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये आपल्या मुलांची चिंता उभी राहिली आहे. एकीकडे पोलिसांनी सदरील घटना या अफवा असल्याचे सांगितले मात्र नुकतेच राया गावातील 15 वर्षीय शाळकरी मुलीला पळवून न्यायचा प्रयत्न झाल्याने अनेक ग्रामपंचायतीनी फेरीवाला,भाजीवाल व इतर व्यावसायिकांना आपापल्या ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश बंद केलेला आहे. यात प्रामुख्याने नांदप, म्हसकळ-अनखर,घोटसई, मोहिली,उतणे-चिंचवली इत्यादी ग्रामपंचायतीतील सर्व ग्रामस्थांनी आपल्या मोबाईलवर स्टेटस,मेसेज,डीपी ठेवण्याबरोबरच गावातील मुख्य प्रवेश द्वारावर बॅनर लावलेले आहेत. अश्या प्रकारच्या आदेशाचे उल्लंघन करून ग्रामपंचायत हद्दीत जर कुणी फेरीवाल्यांनी प्रवेश केलाच तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती सर्व ग्रामपंचायतींनी छापलेल्या बॅनर मध्ये नमूद केलेले आहे. याबाबत नांदप गावचे सरपंच गणेश शेलार यांनी मूल पळविण्याच्या घटनेला ग्रामस्थ घाबरलेले असल्यानेच सर्व संमतीने सदरील निर्णय घेण्यात आल्य याची माहिती दिली.
Share This