कामावरून चिडून जावून एकाला मारहाण ; रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
----------------
रांजणगाव एम आय डी सी त कामावरून चिडुन जावून धारदार हत्याराने वार करून जखमी केल्याने रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
धीरजकुमार सिंग वय - २१ रा.ढोकसांगवी ता.शिरूर मूळ रा. सोनगढवा ,गोपालगंज, बिहार असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून मंगेश राजेंद्र डुकरे वय - २० सध्या रा.करडे रोड कारेगाव ता.शिरूर मूळ रा. पेडगाव ,रिसोड जि.वाशिम यांनी याबाबत तक्रार दाखल केली.
रांजणगाव एम आय डी सी तील आय टी सी कंपनीमध्ये रोजंदारीवर असलेल्या धीरजकुमार सिंग यास तिस-या शिफ्टमध्ये काम करत नसल्याने फिर्यादी मंगेश राजेंद्र डुकरे यांनी त्याबाबत विचारले असता आरोपी धीरजकुमार सिंग याने फिर्यादी मंगेश डुकरे यांना शिवीगाळ करून मै आज काम नही करनेवाला ,तुझे जिसे बताना है बता दे असे म्हणाला. फिर्यादीने सुपरवायझरला सांगितल्याने चिडून जावून धारदार हत्याराने फिर्यादीच्या छातीवर पोटावर डाव्या हाताच्या कोपरावर वार करून जखमी केले. याबाबत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.