• Total Visitor ( 133554 )

कांद्याला क्विंटलला १५०० रूपये कमीत कमी अनुदान दिले पाहिजे तरच कांदा उत्पादक शेतकरी टिकेल ; आमदार अशोक पवार यांचे प्रतिपादन

Raju Tapal March 13, 2023 72

कांद्याला क्विंटलला १५०० रूपये कमीत कमी  अनुदान दिले पाहिजे तरच कांदा उत्पादक शेतकरी टिकेल ;   आमदार अशोक पवार यांचे प्रतिपादन 
            -----------------
नाफेडला कांदा खरेदी करावा लागेल. शेतक-याच्या कांद्याला कमीत कमी १५००/- ( पंधराशे ) रूपये अनुदान दिले पाहिजे तरच कांदा उत्पादक शेतकरी टिकेल असे प्रतिपादन शिरूर ,हवेली तालुक्याचे आमदार,ऍड. अशोक पवार यांनी कोंढापुरी येथे केले.
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणीपुरवठा योजना,आर आर आबा ग्रामसचिवालय इमारत, ग्रामसचिवालय इमारत उर्वरित बांधकाम, कामिनीनाला ओढ्यावर साठवण बंधारा, वळण बंधारा दुरूस्ती, कोंढापुरी ते बुरूंजवाडी रस्ता या विविध विकासकामांचे भूमिपूजन शिरूर हवेली तालुक्याचे आमदार ,ऍड. अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 
माजी सरपंच स्वप्निल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात हनुमान मंदीर पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार पवार बोलत होते.
पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक स्वप्निल ढमढेरे,शिरूर खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, विविध गावचे सरपंच,उपसरपंच, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.
आमदार पवार यांच्या हस्ते विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार यावेळी करण्यात आला. 
श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आमदार,ऍड. अशोक पवार यांच्या हस्ते पुजन,दीपप्रज्वलन  करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
आमदार अशोक पवार पुढे बोलताना म्हणाले, कांद्यासारख्या पिकाचा पार वांदा करून टाकला आहे. एकराला ७० हजार रूपये खर्च  येतो. वांग्याची कोल्हापूरची बातमी वाचली. २४ पैसे किलो वांगे तीच परिस्थिती फ्लॉवरची. स्वामिनाथन कमिटी स्विकारू असे सांगितले होते. एकूण खर्चाच्या दीड पटीने बाजार देवू अशी भूमिका केंद्र सरकारने मांडली होती. परंतू ते काहीच व्हायता होईना. नाफेडच्या बाबतीत एवढ्या घोषणा ,गदारोळ करावा लागला तेव्हा तो सुरू करतो म्हणाल्यात.आम्ही आशावादी आहोत की नाफेडला कांदा खरेदी करावा लागेल.
सगळ्या गोष्टींचे दर वाढलेत.डिझेल कुठल्या कुठे गेले .खतांचे दर वाढलेत. औषधांचेही दर वाढलेत. तीच परिस्थिती इतर पिकांची आहे. सगळ्या गोष्टींचे दर शेतक-याला परवडत नाही. असे सांगून केंद्र सरकारवर टिका करताना आमदार पवार म्हणाले, गेली १० वर्षे साखर ३२ रूपये किलोनेच कारखाना विकतोय.कोणता खर्च वाढला नाही हो ? असा सवाल आमदार पवार यांनी यावेळी केला. जगात साखर ४० रूपये किलोने चाललेली असताना साखरेचा दर ३२ रूपये म्हणजे ३२ रूपयेच आहे. आम्ही सांगितले साखर एक्स्पोर्ट करा .शेतक-याला दोन पैसे मिळतील. परंतू ते काहीही न करता ३१ , ३२ रूपयांच्या आतच साखर कारखान्याला विकावी लागते.त्यामुळे कोट्यवधी रूपयांचे नुकसान शेतक-यांचे होते. 
कृषी केंद्रात पाँस ( poss ) मशिन असते. तुम्हाला खत पाहिजे असेल तर तिथे तुमचं नाव, मोबाईल नंबर, अंगठा असे जातं. नवीनच केंद्र सरकारने असलं अँप ( app ) आणलयं त्यात जात लिहा म्हणत्यातं. शेतक-याला कसली जात हो ? असा सवाल करून आमदार पवार म्हणाले शेतकरी हीच जात आहे. 
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे 8975598628

Share This

titwala-news

Advertisement