चिंचोली मोराची गावला कॅनॉलचे पाणी मिळण्याबाबत चिंचोली मोराची ता.शिरूर येथील ग्रामस्थांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.
शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची येथील नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा अक्षताताई उकिरडे, कार्याध्यक्ष संतोष उकिरडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आपणास समस्त चिंचोलीकर निवेदन देतो की,
शिरूर तालुक्यातील आमचे गाव चिंचोली मोराची हे पर्यटक स्थळ असून सुध्दा आमच्या गावात कित्येक वर्षापासून शेतीसाठी पाणी, पिण्यास पाणी या समस्या आहेत.आम्हाला पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहवे लागते.चिंचोलीच्या जवळच्या परिसरात अवघ्या काही अंतरावर दोन्ही बाजुला कॅनॉल पाटाचे पाणी जाऊन सुध्दा आमच्या गावाला त्याचा फायदा होत नाही.आम्हाला पावसाळा सोडला तर पिण्यासही पाणी नसते.आमच्या गावात पहिल्या पासुन मोरपक्षी आहेत. घरातल्या मुलांना जपावे तशी आम्ही गावकरी मोरांची काळजी घेतो.पण अन्न, पाणी नसल्यामुळे काही मोरांचे स्थलांतर झाले आहे.पुढील काळात अशीच परिस्थिती राहीली तर मोरां सोबत आम्हाला पण स्थलांतरित व्हावे लागेल.
मुख्यमंत्री साहेब आपणांस विनंती आहे की, आपण महाराष्ट्र दौ-या मध्ये आमच्या गावाला भेट द्यावी. गावच्या पाणी समस्याकडे लक्ष द्यावे.आम्ही या अगोदर पाणी समस्यासाठी 20 जुन 2022 ला पाणी जन आक्रोश मोर्चा हा चिंचोली मोराची मधुन कुलदैवत खंडोबाचा जागर करत शिरूर तहसिलदार कार्यालय वर नेला होता. आम्हाला काही उत्तर आले नाही.आपण लवकरात लवकर पाणी समस्या सोडवावी असे नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा अक्षताताई उकिरडे, कार्याध्यक्ष संतोष उकिरडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.