• Total Visitor ( 84587 )

कंटेनर -एस टी बसच्या अपघातात 8 जण जखमी ;

Raju Tapal October 26, 2021 33

कंटेनर -एस टी बसच्या अपघातात 8 जण जखमी ; सोलापूर -पुणे महामार्गावरील चिखली शिवारातील घटना 

 

समोरून निघालेल्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्याने भरधाव जाणारी एस टी त्यावरून आदळून झालेल्या अपघातात 8 जण जखमी झाले.

सोलापूर -पुणे महामार्गावरील चिखली शिवारात सोमवारी दि. 25 ऑक्टोबरला मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

एम एच 20 बी एल  3878 या क्रमांकाची एस टी बस पुण्याहून उमरगाकडे निघाली होती. ती एस टी बस चिखली शिवारात येताच तिच्या समोरून कंटेनर चालला होता.

कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने एस टी ने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली .

या अपघातात नामदेव शंकर येवले वय 40 रा.तेलवाड ता.निलंगा , नामदेव मनोहर कांबळे वय 31 रा.माडज ता.उमरगा, प्रभाकर पंडीत बिराजदार वय 21 रा कासार सिरशी, प्रवीण प्रल्हाद ननवरे वय -30 रा.सोलापूर, सारिका प्रवीण ननवरे वय -28 रा.सोलापूर, समाधान उत्तम वाघमारे वय -35 रा.उंबरे, काशिनाथ शिवलिंग आरबाळे वय-65 रा.कासार शिरशी , योगेश बसवराज दुधाळे वय -18 रा.सोलापूर हे अपघातात जखमी झाले.

अपघात होताच कंटेनर न थांबता पुढे निघून गैला. या अपघातात एस टी बसचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच मोहोळ येथील वाहतूक नियंत्रक विलास देसाई या़नी घटनास्थळी जावून जखमींना मदत केली. सर्व जखमींना मोहोळ येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघाताची नोंद मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे अपघाताचा तपास करीत आहेत.

Share This

titwala-news

Advertisement