कारची चोरी करणा-या आरोपीस शिरूर पोलीसांनी अटक केली.
सागर नवनाध निकम रा.मढी ता.पाथर्डी जि.अहमदनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून नागेश तांबरे यांनी याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी नागेश तांबरे हा उबेर चालक म्हणून पुणे येथे काम करत असून नागेश तांबारे हा पुणे रेल्वे स्टेशन येथे असताना आरोपी सागर नवनाथ निकम याने फिर्यादी नागेश तांबारे यांची उबर कार अँप द्वारे शिरूर येथे जाण्याकरिता बुक केली.
कार शिरूर येथे आली असता आरोपी सागर निकम याने फिर्यादी नागेश तांबारे यांना कार थांबविण्यास सांगून बियर घेवून ये, गाडीचा ए सी चालू ठेव असे सांगितले. कार चालक फिर्यादी नागेश तांबारे बिअर आणण्यासाठी दीप वाईन्समध्ये गेला असता आरोपी सागर निकम याने चालू वॅगनर कार नंबर एम एच १२ क्यू जी ९८५० घेवून नगरकडे पळून गेला.
फिर्यादी नागेश तांबारे यांनी याबाबत शिरूर पोलीसांत फिर्याद दिली.
पोलीसांनी उबेर कंपनीकडून आरोपीचा मोबाईल क्रमांक हस्तगत करून प्राप्त मोबाईल क्रमांकावरून तपास केला असता आरोपी सागर निकम हा मढी ता.पाथर्डी जि.अहमदनगर येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलीसांनी चोरी गेलेली कार ताब्यात घेवून आरोपी सागर निकम यास अटक केली.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार संतोष साळूंखे यांनी ही कामगिरी केली.