• Total Visitor ( 84539 )

कर्नाटकातून पुण्याला येत असलेला 33 लाखांचा गुटखा जप्त

Raju Tapal January 11, 2022 36

कर्नाटकातून पुण्याला येत असलेला 33 लाखांचा गुटखा जप्त ; मिरज येथील महात्मा गांधी पोलीसांची कारवाई 

कर्नाटकातील अथणी येथून पुण्याला येत असलेला ३३ लाख रूपयांचा गुटखा मिरज येथील महात्मा गांधी पोलीसांनी जप्त करण्याची कारवाई केली.

ट्रकमध्ये भुशाच्या पोत्याआडून गुटख्याची वाहतूक केली जात होती.

दाऊल इक्बाल मुल्ला वय - २६ रा.मलाबाद ता.अथणी जि.बेळगाव , हसन आप्पासाहेब सनदी वय - ३० रा. जकारहट्टी ता.अथणी जि.बेळगाव कर्नाटक अशी अटक. केलेल्या दोघांची नावे असून पोलीसांनी ३३ लाख रूपयांचा गुटखा व आयशर ट्रक असा ५० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

कर्नाटकातील अथनी येथून आयशर ट्रकमधून गुटखा, पानमसाला सुगंधी तंबाखू पुण्याला जाणार असल्याची माहिती डि.बी.पथक गांधी चौकी पोलीसांना मिळाल्यानंतर गांधी चौकी पोलीसांनी नाकाबंदी करून राजधानी हॉटेल समोरून जाणा-या आयशर ट्रकला थांबवून झडती घेतली असता भुसा भरलेल्या पोत्यांच्या मागील बाजूस पांढ-या पोत्यामध्ये गुटखा आढळून आला.

पांढ-या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पोत्यात २५ लाख २० हजार रूपयांचा हिरा पानमसाल्याचे १०५ पाऊच , प्रत्येक पाऊचमध्ये ३२ पुड्या अशा २०० पोत्यांमध्ये २१ हजार पाऊच, दुस-या पोत्यात ७१७ सुगंधी तंबाखूचे १०५ बॉक्स प्रती  बॉक्समध्ये ३० पुड्या , असे २०० पोती, ८ लाख ८०० रूपयांचा रत्ना छाप तंबाखू ,१६ लाख रूपये किंमतीचा आयशर ट्रक पोलीसांनी जप्त केला. 

उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Share This

titwala-news

Advertisement