कारवरील ताबा सुटल्याने कार विहीरीत जाऊन ३० वर्षीय महिलेचा मृत्यू ; शिरूर तालुक्यातील करंदी येथील घटना
कारवरील ताबा सुटल्याने कार थेट विहीरीत जाऊन कोसळल्याने झालेल्या अपघातात ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
शिरूर तालुक्यातील करंदी येथे ही घटना घडली.
वर्षा आदक असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
आदक दाम्पत्य कारने प्रवास करत होते. यावेळी वर्षा आदक कार चालवत होत्या.
समोरून अचानक दुचाकी आल्याने त्यांचा कारवरील ताबा सुटून ब्रेक दाबण्याऐवजी एक्सीलेटर दाबल्याने कार थेट विहीरीत जावून कोसळली. या घटनेत वर्षा आदक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बाजूस बसलेल्या कारचालक महिलेच्या पतीने कारमधून उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. शिक्रापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत