कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ९/आय प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई सुरुच !
महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ९/आय प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आडवली ढोकली येथील चाळीस एकर परिसरातील कोहिनूर प्रोजेक्टच्या बाजूला असलेल्या बांधकामधारक नितीन चिकनकर* यांच्या तळ + ४ मजली इमारतीच्या स्लॅब बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली.
सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि २ काँक्रीट ब्रेकर व १० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.