• Total Visitor ( 133313 )

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ६/फ प्रभाग व ७/ह प्रभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई !

Raju Tapal March 15, 2023 94

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ६/फ प्रभाग व ७/ह प्रभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई ! 
महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ६/फ प्रभागाचे सहा आयुक्त भरत पाटील यांनी डोंबिवली पूर्व येथील खंबाळपाडा मंजूनाथ कॉलेज जवळ बांधकामधारक राम नरेश यादव यांच्या पत्र्याच्या शेडच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिक्षक जयवंत चौधरी व इतर कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी व टिळकनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जेसीबी व १० कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली.
त्याचप्रमाणे ७/ह प्रभागातही सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी डोंबिवली पश्चिम, कोपर क्रॉस रोड येथील अंबामाता मंदिर समोर बांधकामधारक एल.के. शहा यांच्या तळ + ७ मजली इमारतीच्या स्लॅब बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिक्षक अरुण पाटील व इतर कर्मचारी, महापालिका पोलिस  यांच्या मदतीने आणि २ काँक्रीट ब्रेकर व १० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

Share This

titwala-news

Advertisement