केडीएमसीची प्लास्टिक पिशव्या बंदी दिखाव्यापुरतीच
मांडा टिटवाळा परिसरात सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी प्लास्टिक पिशव्या बंदीची कडक अंमल बजावणी करा अश्या सक्त ताकीद देऊन ही प्लास्टीक पिशव्यांच्या सर्रास वापर होताना दिसून येतोय. प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीसाठी एका खाजगी कंपनीला कारवाईचा ठेका दिलेला असतानाही त्या ठेकेदाराचे अधिकारी कर्मचारी काही केल्या फिरकत नसल्याने मांडा टिटवाळा परिसरात सर्वच ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून येतेय. सुरुवातीला 5 ते 6 जणांचे पथक प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल करीत होते मात्र आता गेल्या दोन महिन्यांपासून प्लास्टिक पिशव्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने कारवाई पथकही चिरीमिरी घेऊन कारवाई टाळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत केडीएमसी चे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सदरील कंपनीचा ठेका रद्द करावा किंवा सदरील कामे करणाऱ्यांची अदलाबदली करावी जेणे करून प्लास्टिक पिशव्यांच्या कारवाईला पुन्हा गती येईल अन्यथा चिरीमिरीच्या नादात हा ही निर्णय बारगाळताना दिसून येत आहे.