केडीएमसीच्या घनकचरा विभागाच्या गाड्यांची दुरावस्था
केडीएमसी घनकचरा विभागाने ज्या कचरा उचलण्यासाठी गाड्या ठेवलेल्या आहेत. सद्य स्थितीत अनेक गाड्या नादुरुस्त अवस्थेतच चालविल्या जातात. त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने भर रस्त्यात गाडी नादुरुस्त होणे,पंचर होणे असे प्रकार वारंवार होत असतात. त्यामुळे भर रस्त्यात ट्रॅफिक जॅम होत असते. आजही घनकचरा विभागाची संपूर्ण कचरा भरलेली गाडी बल्याणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रस्त्यातच नादुरुस्त झाल्याने येथे रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. त्यातच पावसामुळे संपूर्ण कचऱ्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात सुटलेली होती. तरी महापालिका प्रशासनाने आपल्या कचऱ्याच्या गाड्यांची देखभाल व दुरुस्ती करून घ्यावी असे नागरिकांतून बोलले जाते.