टिटवाळा व बल्याणीत केडीएमसीची तोडक कारवाई
राजू टपाल.
टिटवाळा :- केडीएमसीच्या अ प्रभाग क्षेत्राने टिटवाळा पूर्व रीजन्सी सर्वम शेजारी सुरू असलेले आरसीसी स्ट्रक्चर निष्कासित करण्यात आलेले आहे. तसेच बल्याणी खजूरवाडी येथील पूर्णावस्थेत असलेले ४ सदनिकांचे वीट बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे. तसेच ५ नळ जोडण्या देखील खंडित केल्या आहेत..
त्यामुळे अनधिकृत बांधकाम विभागाकडून १ आरसीसी स्ट्रक्चर, एकूण ४ सदनिका व ३ फाउंडेशन निष्काशीत केलेले आहेत तसेच ५ नळ जोडण्या खंडित केलेले आहेत.
सदर कारवाई वेळेस अनधिकृत बांधकाम अधीक्षक,वरिष्ठ लिपिक, लिपिक, पथकाचे सात कामगार, ठेकेदाराचे १० कामगार व एक जेसीबी यांच्या साह्याने कारवाई करण्यात आली. तसेच मनपाचे तीन पोलीस कर्मचारी व एम एस एफ चे ३ कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती प्रमोद पाटील सहाय्यक आयुक्त १ /अ प्रभाग यांनी टिटवाळा न्यूजला दिली.