कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्व प्रभागात अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याची धडक कारवाई !
एकूण १३३ अनधिकृत नळ जोडण्यांवर काल दिवसभरात कारवाई आणि "७/ह" प्रभागातील अनधिकृत नळजोडणीबाबत गुन्हा दाखल !
महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या सक्त निर्देशानुसार महापालिकेच्या सर्वच प्रभागांत काल दिवसभरात अनाधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याची धडक मोहिम प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी राबविली .
"१/अ" प्रभागात बल्याणी परिसरातील एकूण अर्धा इंची १७ नळजोडण्या( १ अनिवासी व १६ निवासी) खंडीत करण्यात आल्या. "२/ब" प्रभागात उंबर्डे परिसरातील अर्धा इंची ५ अनाधिकृत नळ जोडणी खंडीतकरण्याची कारवाई करण्यात आली. तसेच "३/क" प्रभागातील देवानंद भोईर चाळ, चंदनशिवेनगर या परिसरातील अर्धा इंची २१ अनाधिकृत नळ जोडणी खंडीत करण्याची धडक कारवाई करण्यात आली."४/जे" प्रभागात अशोकनगर , वालधुनी या Records अर्धा इंची १३ अनाधिकृत नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली."५/ड" प्रभागात काटेमानिवली या परिसरात अर्धा इंच ५ अनाधिकृत व १ इंच ५ अनाधिकृत नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच "६/फ" प्रभागात खंबाळपाडा, कांचनगाव या परिसरात १ इंची १० व अर्धा इंच २ अशी एकूण १२ अनाधिकृत नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली. तर "७/ह" प्रभागातील पूर्ण परिसरात १ इंची एकूण १५ अनाधिकृत नळ जोडणी खंडीत करण्यात आल्या तसेच ट्युलिप बिल्डिंग या इमारतीवर अनाधिकृत नळ जोडणीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे."८/ग" प्रभागात नेरूरकर रोड, म्हात्रे नगर, आयरेगाव या परिसरात अर्धा इंच ५ व १ इंच ७ अशी एकूण १२ अनाधिकृत नळ जोडणी खंडीत करण्यात आली. "९/आय" प्रभागात गोळवली, पिसवली या परिसरात एकूण २२ अनाधिकृत नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली, तसेच *"९/आय" प्रभागातील १४ वाणिज्य आस्थापनांवर अनधिकृत नळ जोडणी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी दिली. त्याचप्रमाणे "१०/ई" प्रभागात देखील नांदिवली, भोपर व देसलेपाडा या परिसरात ६ पाऊण इंच अनधिकृत नळ जोडणींवर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे व किरण वाघमारे यांच्या अधिपत्त्याखाली सर्व प्रभागातील उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रभागांचे सहा.आयुक्त, प्लंबर व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर कार्यवाही यापुढेही सुरु राहणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली.