कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनी अभिवादन !
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनी आज महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपआयुक्त तथा महापालिका सचिव धैर्यशील जाधव, उपआयुक्त अर्चना दिवे, वंदना गुळवे, विनय कुलकर्णी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव, सहा.आयुक्त संजयकुमार कुमावत, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार, सामाजिक कार्यकर्ता दिलीप रोकडे व महापालिका कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते .
कल्याण (प.) मधील लाल चौकी येथील अण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्यासही महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापालिका अधिकारी, तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.