• Total Visitor ( 133002 )

केडीएमसीची अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई

Raju Tapal December 30, 2022 120

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या  8/ग प्रभाग क्षेत्रातील तळ + 8 मजली अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई !

महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांचे निर्देशानुसार विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप, स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली 8/ग प्रभागाचे सहा. आयुक्त संजय साबळे यांनी डोंबिवली पूर्व पांडूरंग वाडी, रात्र निवारा केंद्रा जवळ  बांधकामधारक चेतन माळी यांच्या तळ + 8 मजली अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली.

सदर कारवाई टिळकनगर स्टेशनचे पोलीस अधिकारी, महापालिका पोलीस कर्मचारी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे व फेरीवाला पथकाचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि 3 कॉप्रेसर, 1 जेसीबी , 1 गॅस कटर सहाय्याने करण्यात येत आहे.

Share This

titwala-news

Advertisement