कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्य विर वि.दा.सावरकर यांच्या जयंती दिनी अभिवादन !
थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे जयंती दिनी आज महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात, महापालिका सचिव तथा विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थित डॉ. प्रतिभा पानपाटील, उपअभियंता भागवत पाटील, सहा. विक्रीकर आयुक्त प्रमोद बच्छाव, प्रा.प्रल्हाद चौधरी, उद्योजक विजय कदम,सामाजिक कार्यकर्ता पंकज सिंग व महापालिकेतील कर्मचारी वर्ग यांनी देखील स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.
तसेच महापालिका भवनातील, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर सभागृहातील तैलचित्रासही महापालिका सचिव तथा विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.