कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनी अभिवादन !
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे जयंती दिनी आज महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात संजय जाधव , विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) यांनी "यशवंतराव चव्हाण" यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित प्राध्यापक जान्हवी संजय जाधव तसेच जनसंपर्क विभागातील कर्मचारी व इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील "यशवंतराव चव्हाण" यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.