निलंगा तालुक्यातील केळगाव ते बुजरूकवाडी मार्गावर टेम्पो व जीपची समोरासमोर झालेल्या धडकेत सहाजण गंभीर जखमी झाले.
निटूरकडे जाण्याच्या दिशेने टेम्पो क्रमांक एम एच १४ ए एच ६२२३ व जीप क्रमांक एम एच १४ सी सी ८३३८ समोरासमोर अपघात होवून सहाजण गंभीर जखमी झाले. जखमींची नावे समजू शकली नाही.
सोयाबीनची गुळी घेवून टेम्पो केळगावच्या दिशेने जात होता. उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथून लग्नाचे व-हाड घेवून जीप निघाली होती. या अपघातात जीपचा चुराडा झाला. जखमींना निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
अंमलदार सत्यवान कांबळे, पोलीस काँन्स्टेबल हरी कांबळवाड यांनी पंचनामा करून दोन्ही वाहनांना महामार्गाच्या बाजूला करून वाहतूक बाजूला केली.