खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शंखेश्वर नगर नांदवली
येथील शिवसेना शाखेचे शानदार उदघाटन
शंखेश्वर नगर येथील शिवसेना शाखा प्रमुख परेश पाटील यांच्या शाखेचे खा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शानदार उदघाटन शनिवारी सायंकाळी करण्यात आले .
यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उप जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, प्रकाश म्हात्रे, राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, युवा पदाधिकारी सागर जेधे, सागर दुबे, कल्याण तालुका संघटक अर्जुन पाटील, एकनाथ पाटील, , बंडु पाटील,रवी अंबो म्हात्रे, अनिल पाटील , वैकुंठ म्हात्रे, लालचंद म्हात्रे, आकाश देसले, सतिश मोडक, संतोष चव्हाण हे जेष्ठ पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
तुतारीच्या निनादात खा.डॉ. शिंदे यांचे स्वागत केल्यानंतर खा. डॉ. शिंदे यांनी शाखा क्र.११५ चे उदघाटन केले.व्यासपीठावर शाखाप्रमुख परेश पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी खा.डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले कि, या
विभागातील लोकांचे समस्या ऐकण्यासाठी दररोज शाखेत बसा.शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी
एका शिवसेना शाखेपासून सुरुवात केली आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्यातील कारभार पहातात.सदानंद थरवळ, गोपाळ लांडगे, एकनाथ पाटील मामा मुळे शिवसेना वाढली. हे अजूनही पक्षासाठी झटतात. विद्यार्थी दशेतून मी खासदार झालो. शिवसेनमुळे चेहरा माहिती नसलेल्या व्यक्तीला खासदार केले हेच सेनेचे श्रेय आहे. शिवसेना समजून घ्या.पदाधिकारी शिवसैनिकांचा आदर करा.पक्ष शिस्त पाळा निवडणूक आली म्हणून शिवसेना शाखा उघडत नाही. सगळ्या गा-हाणी ऐकण्यासाठी शाखेत शाखाप्रमुख व्यक्तीश: बसला पाहिजे. या उदघाटन प्रसंगी लकी ड्रा उपस्थित महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता.लकी ड्रा मध्ये सुरेखा राम, इंदिरा अरुण पाटील, यांना पैठणी. परेश पाटील यांच्या मातोश्री
विमल पाटील, निकीता पाटील यांच्या हस्ते सीमा मोरे यांना नथ मान देण्यात आला.. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष ब्रम्हा माळी, संजय पाठारे उपस्थित होते.अनेक नागरिकांनी,
नातेवाईक, ग्रामस्थांनी
परेश पाटील यांना यावेळी शुभेच्छा दिल्या