खड्ड्याने घेतला कट्टर जेष्ठ शिवसैनिकांचा बळी...!
Raju Tapal
July 03, 2022
163
खड्ड्याने घेतला कट्टर जेष्ठ शिवसैनिकांचा बळी...!
ठेकेदार व प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी..!
कल्याण मुरबाड महामार्गावरील म्हारळ, वरप कांबा येथील जीवघेण्या खड्ड्याने अखेरीस कांबा पावशेपाडा गावातील जेष्ठ कट्टर शिवसैनिक नारायण महादू भोईर यांंचा बळी घेतला असून या कामाचा ठेकेदार व नँशनल हायवे अँथोरटी च्या अधिका-यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भोईर कुंटूबिय करीत आहेत. तर दुसरीकडे या परिसरातील निगरगट्ट लोकप्रतिनिधी विरोधात कमालीचा संताप व्यक्त होत आहे. पहिल्याच पावसाने कल्याण मुरबाड महामार्गावर म्हारळपाडा,ओमकार नगर, सिमा रिसाँर्ट, बंजरग हार्डवेअर, सेक्रेट हार्ट स्कूल, टाटा पावर हाऊस, कांबा पेट्रोल पंप, पावशेपाडा बंस थांबा, पाचवामैल या परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. म्हारळ पाडा ते पाचवामैल दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु ठेकेदारांच्या चुकीच्या व नियोजन शुन्य अर्धवट कामामुळे यावेळी वाहनचालकांसह या परिसरातील लोकांना पुर खड्डे, चिखल, अश्या विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कांबा पावशेपाडा गावातील शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक तसेच गेली३०/३५वर्षे दुध व्यवसाय करणारे शेतकरी नारायण महादू भोईर वय ६५ वर्षे हे दुधाच्या किटल्या घेऊन आपल्या मोटारसायकल ने उल्हासनगर हून घराकडं येत असताना म्हारळ पाड्याजवळ लहान मुलांना वाचविता ते खड्ड्यात पडले,यामध्ये त्यांची नस फाटली, त्यांना ताबडतोब कल्याण च्या बाई रुक्मिणीबाई हाँस्पिटल येथे व नंतर खडकपाडा येथील वेदांत हाँस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व नातवंडे असा परिवार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. या रस्त्याचे काम घेणाऱ्या ठेकेदार व त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या नँशनल हायवे अँथोरटी च्या अधिका-यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांचा पुतण्या माझी पोलीस पाटील संजय भोईर यांनी केली आहे. तर वर्षे अन् वर्षे म्हारळ, वरप कांबा रायते, मानिवली, मोहिली,आदी गावाना पुर,खड्डे, अवकाळी पावसामुळे नुकसान, दूषित पाणी, पाणी टंचाई, कचरा, डंम्पिंग मैदान, समस्या कडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधी विरोधात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे तसेच भविष्यात अजूनही किती नागरिकांचा बळी जाणार हे सांगता येत नाही.
Share This