खासगी कॅब, ट्रॅव्हल्सकडून सर्वसामान्य प्रवाशांची लुट सुरू
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा या तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील एस टी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. या संपाचा फटका दिवाळीनिमित्त गावाकडे जाणा-या ,गावाकडून परतणा-या प्रवाशांना बसत आहे. एस टी कामगारांचा संप चालू झाल्यामुळे खासगी कॅब, ट्रॅव्हल्स कडून सर्वसामान्य प्रवाशांची लुट सुरू करण्यास सुरूवात झाली आहे.
खासगी ट्रॅव्हल्स , कॅब वाल्यांनी एस टी संपाचा गैरफायदा घेत गाडीभाड्यात तिप्पट चौपट दर केले आहेत.
खासगी ट्रॅव्हल्सचे वाढीव दर पुढीलप्रमाणे :-
शिवाजीनगर पुणे ते अमरावती १५०० रूपये,
पुणे ते उस्मानाबाद ११०० रूपये,
पुणे ते लातूर १२०० रूपये,
पुणे ते बीड १००० रूपये,
पुणे ते वर्धा १२०० रूपये,
पुणे ते नाशिक ५०० ते ६०० रूपये,
पुणे ते नागपूर १५०० ते १८०० रूपये,
पुणे ते औरंगाबाद ७०० रूपये, पुणे ते मुंबई ६०० ते ७०० रूपये
अशी प्रवासी भाढेवाढ खासगी ट्रॅव्हल्स कडून करण्यात आलेली आहे.