• Total Visitor ( 133998 )

कोलगाव ग्रामस्थांचे शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांना निवेदन

Raju tapal March 08, 2025 10

कोलगाव साईनगर कॉलनीतील रस्त्यावरील अतिक्रमण हटवू न्याय द्या..

कोलगाव ग्रामस्थांचे शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांना निवेदन

तर आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा रस्ता येत्या मे महिन्यापर्यंत आपण खुला करून देऊ असे आश्वासन संजू परब यांनी दिले ग्रामस्थांना

सावंतवाडी :- कोलगाव साईनगर येथील गेले अनेक वर्ष रस्ता खुला करण्याबाबत ग्रामस्थांकडून होत असलेल्या मागणीबाबत वारंवार लक्ष वेधून देखील ग्रामपंचायत रस्ता खुला करण्यास तयार नसल्याने आज कोलगाव ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांच्याकडे धाव घेत कैफियत मांडली.जवळपास ४२ कुटुंबाचा हा विषय आहे. दरम्यान, हा रस्ता खुला करण्याबाबत तात्कालीन तहसीलदार म्हात्रे यांनी 2020 मध्ये ग्रामपंचायतला पत्र दिले होते.तरी देखील ग्रामपंचायत कोणतेही दखल घेत नसल्याने आज ग्रामस्थांनी संजू परब यांच्याकडे याबाबत लक्ष वेधले. यावेळी आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा रस्ता येत्या मे महिन्यापर्यंत आपण खुला करून देऊ असे आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना परब यांनी दिले. हा रस्ता काही मुस्लिम समाज बांधवांकडून अडवण्यात आल्याचा देखील आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.

यावेळी राजेश गोंदावळे,करजाना सय्यद,नितीन उरणकर, अरविंद मेस्त्री, महादेव साळवी, रामचंद्र वाडकर, दत्ताराम स्वार,धोंडू इन्सुलकर, ओंकार माने, संतोष केळुलकर, उमेश प्रभू, कृष्णा तेंडुलकर, अरविंद मुंनकर, सुभाष सावंत, शरद जाधव, वसंत जाधव, भास्कर मेस्त्री, एस एस मोरे, आर.ए.स गवणकर आदी उपस्थित होते.
 

Share This

titwala-news

Advertisement