कोंढापुरी येथील शेतक-याच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत
Raju Tapal
December 09, 2021
45
कोंढापुरी येथील शेतक-याच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत
मराठी १ न्यूज बातमीचा इफेक्ट
शेतीपंपाचे वीजबील भरूनही शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतक-याच्या शेतीपंपाचा आठवडाभरापासून खंडीत असलेला विद्यूतपुरवठा सुरळीत झाला आहे.
शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांनी त्यांना आलेले २९ हजार २५० रूपयांचे शेतीपंपाचे वीजबील एक रकमी भरले. मात्र तरीही त्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला नव्हता.
या बाबत मराठी १ न्यूजने बातमी प्रसारित केली होती. मराठी १ न्यूजमध्ये यासंबंधीची बातमी प्रसारित झाल्यानंतर मराठी १ न्यूज च्या बातमीची दखल घेवून दि. ९/१२/२०२१ रोजी दुपारी साडेअकरा नंतर कोंढापुरी येथील शेतकरी श्री.विजय ढमढेरे यांच्या शेतीपंपाचा विद्यूतपुरवठा सुरळीत सूरू झाला.
शेतीपंपाचा विद्यूतपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी लाईनमन लक्ष्मण खरसडे तसेच महावितरणचे तंत्रज्ञ रामेश्वर ढाकणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेतीपंपाचा विद्यूतपुरवठा सुरळीत सुरू केल्याबद्दल शेतकरी श्री.विजय ढमढेरे यांनी महावितरणचे लाईनमन लक्ष्मण खरसडे , तंत्रज्ञ रामेश्वर ढाकणे महावितरणच्या अधिका-यांचे तसेच बातमी प्रसारित केल्याबद्दल मराठी १ न्यूजचे आभार मानले.
Share This