महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शिक्रापूर हिवरे रोड येथील दिलीप धर्माजी वाबळे यांच्या शेतात गुरूवार दि.२५/११/२०२१ रोजी सकाळी साडेनऊ वाजता सेंद्रीय शेतीशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कृषी विभागाचे शिक्रापूर येथील कृषी अधिकारी श्री.अशोकराव जाधव यांनी ही माहिती दिली.
सेंद्रीय शेतीशाळेत दशपर्णी अर्क ,जीवामृत, वेस्ट डिकॉम्पोजेर ,गांडूळखत, निंबोळी अर्क तयार करणे, व डेमो दाखविण्यात येणार असून सेंद्रीय शेती काळाची गरज बनली असून सेंद्रीय शेतीशाळेस सर्वांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्रापूर कृषी विभागाचे कृषीअधिकारी अशोकराव जाधव यांनी केले आहे.