कृषीपंप वीजजोडणी योजना जाहीर होण्याअगोदर थकबाकी भरलेल्या शेतक-यांना या योजनेचा लाभ देण्याची शेतक-यांची मागणी
कृषीपंप वीजजोडणी योजना जाहीर होण्याअगोदर थकबाकी भरलेल्या थकबाकीदार शेतक-यांना कृषीपंप वीजजोडणी योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी शेतीपंपाचे वीजबील भरलेल्या शेतक-यांकडून केली आहे.
राज्य शासनाच्या कृषी पंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्षे थकबाकीमध्ये असलेल्या कृषीपंपाचे वीजबील कोरे करण्याची शेतक-यांना संधी देण्यात आली आहे.
थकबाकीदार शेतक-यांनी चालू शेतीपंपाचे वीजबील येत्या मार्च २०२२ पर्यंत थकबाकीचा ५० टक्के भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के माफ करण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहिर करण्यात आले आहे.
कृषी पंप वीजजोडणी धोरण कृषीपंपाच्या थकबाकीची ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम माफ करण्यात येणार असल्याचे जाहीर होण्याअगोदर ज्या शेतक-यांनी त्यांना आलेली वीजबीले एकरकमी भरली. त्यांना कृषी पंप वीजजोडणी योजनेचा लाभ मिळाला नाही.
ही योजना जाहिर होणार अगोदर ज्या शेतक-यांनी शेतीपंपाची वीजबीले पूर्ण भरली आहेत त्या शेतक-यांना कृषीपंप वीजजोडणी योजनेचा लाभ देण्याची मागणी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांनी टिटवाळा न्यूजकडे केली.