कृत्रिम महागाई विरोधात काँग्रेसच्या महिला जिल्हा कडून महीला जिल्हा अध्यक्ष कांचन कुळकर्णी व जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण येथील शिवाजी चौकात महागाई विरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे.
दिवसें दिवस महागाई वाढतच चालली आहे, तर ईंधनाचे दरही वाढले आहे, गँसचे दर हजारचे आसपास तर पेट्रोल व डिझेल हि शंभरच्या वर गेले आहेत, जनता महागाईने होरपळून निघाली आहे, केंद्र सरकार शेतकरी यांच्यावरही अन्याय करीत आहे, हया सर्व बाबींचा निषेध करीत असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले की केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या संपूर्ण महाराष्ट्रात जन जागरण अभियान सुरू आहे, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तीन दिवसा पुरवीच कल्याण येथे पदयात्रेत आले होते, केंद्र सरकारने महागाई किती वाढवली आहे, हे जनतेसमोर सांगितले आहेच.