• Total Visitor ( 84997 )

लग्नाची खरेदी करून परतणा-या नववधूचा अपघाती मृत्यू

Raju Tapal January 21, 2022 35

लग्नाची खरेदी करून परतणा-या नववधूचा अपघाती मृत्यू ; पुणे - सोलापूर महामार्गावरील कौठीचा मळ्याजवळील घटना 

स्वत;च्याच लग्नाची खरेदी करून भावासह गावाकडे परतणा-या नववधूचा वाटेतच अपघाती मृत्यू झाला. अपघातात नववधूचा भाऊ गंभीर जखमी झाला.

प्रतिक्षा सदाशिव कांबळे वय - २१ रा.मलठण  ता.दौंड असे अपघातात मृत्यू झालेल्या नववधूचे नाव असून तिचा भाऊ शुभम सदाशिव कांबळे अपघातात गंभीर जखमी झाला आहे.प्रतिक्षा कांबळे हिचे पुढच्या महिन्यात लग्न होते. लग्नाच्या खरेदीसाठी ती तिचा भाऊ शुभम याच्यासह मोटरसायकलवर गुरूवारी सकाळी पुणे शहरात गेले होते. दिवसभर खरेदी केल्यानंतर सायंकाळी मलठण ता.दौंड येथे घरी परतत असताना वाटेतच कौठीचा मळ्याजवळ डंपरने ठोकरल्याने हा अपघात झाला. प्रतिक्षाच्या डोक्याला गंभीर मार लागून तिचा जागीच मृत्यू झाला.तर शुभम हा गंभीर जखमी झाला.अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह फरार झाला. अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक अपघातस्थळी जमा झाले.टोलनाक्यावरील रूग्णवाहिकेतून त्यांना रूग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी प्रतिक्षाला मृत घोषित केले.

Share This

titwala-news

Advertisement