लाकडी बॅटने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू ; करवीर तालुक्यातील वडणगेतील घटना
Raju Tapal
November 17, 2021
30
लाकडी बॅटने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना करवीर तालुक्यातील वडणगे येथे घडली.
प्रदीप तेलवेकर वय - ३५ शिवाजी गल्ली असे खून झालेल्याचे नाव आहे.
जमावाने केलेल्या मारहाणीत संशयित निलेश पाटील वय २८ हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी दि.१५ नोव्हेबरला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
प्रदीप तेलवेकर व त्याचा मित्र नीलेश पाटील हे दोघे तलावाच्या परिसरात बोलत बसले होते. दोघांनी मद्य प्राशन केले होते.
यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात नीलेशने बॅटने प्रदीपला मारहाण सुरू केली. प्रदीपनेही त्याला चोप दिला. बॅटचा घाव वर्मी बसल्याने प्रदीप जागीच कोसळला. घाबरलेल्या नीलेशने प्रदीपला जखमी अवस्थेत तेथेच सोडून घराकडे धाव घेतली.
दरम्यान प्रदीपचा खून झाल्याची माहिती गावात पसरल्यानंतर संशयित नीलेशचा शोध सुरू झाला. त्याला शोधून जमावाने मारहाण केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
घटनास्थळी करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर व पोलीसांचा फौजफाटा दाखल झाला.
Share This