लखीमपूर शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद....!
लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांड आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब,मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य),शिवसेना पक्षप्रमुख यांच्या आदेशाने आज दि.११ ऑक्टोबर २०२१ रोजी "महाराष्ट्र बंद " ची हाक देण्यात आली होती.मा.ना.एकनाथ शिंदे साहेब मंत्री, नगरविकास, सार्व. बांधकाम(सार्व. उपक्रम)यांनी सुद्धा ,शांततेने ठाणे जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के,शहरप्रमुख रमेश वैती,शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार,सभागृह नेते अशोक वैती,गटनेते दिलीप बारटक्के,राम रेपाळे,माजी नगरसेवक पवन कदम,मंगेश पेडणेकर,कमलेश चव्हाण,प्रकाश पायरे,किरण नाकती,दीपक म्हस्के,राम काळे,नितीन ढमाले, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक यांनी रस्त्यावर उतरून ठाणे शहरातील विविध ठिकाणी केंद्र सरकार विरोधात निषेध व्यक्त केला.