• Total Visitor ( 84694 )

लंपी स्किन डिसीजची लक्षणे आढळल्यास जनावरांना प्रतिबंधक लस टोचावी...

Raju Tapal September 03, 2022 42

लंपी स्किन डिसीज् आजाराची लक्षणे जनावरांमध्ये आढळून आल्यास जनावरांना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी ; शिरूर पंचायत समितीचे पशुधनविकास विस्तार अधिकारी डॉ. नवनाथ पडवळ यांचे आवाहन
          
जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज् आजाराची लक्षणे आढळून आल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून जनावरांना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी असे आवाहन शिरूर पंचायत समितीचे पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. नवनाथ पडवळ यांनी केले आहे.
  सद्य:स्थितीत आपल्या पुणे जिल्ह्यात व बाजूच्या जिल्ह्यांमध्ये लंपी स्किन डिसीज् नावाचा नवीन आजार आलेला आहे. या आजारामध्ये जनावरे खात नाहीत. पहिल्यांदा त्यांना ताप येतो त्यामुळे पशुपालक चिंतेत असतात. शिरूर तालुक्यामध्ये अजून एकही केस नसल्यामुळे शेतक-यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
जनावरांना प्रतिबंधक लस म्हणून बॉक्सची व्हॅक्सिन जिल्हास्तरावरून मागणी केलेली आहे असे शिरूर पंचायत समितीचे पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. नवनाथ पडवळ यांनी सांगितले.
या आजाराची अधिक माहिती देताना पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. पडवळ यांनी सांगितले, हा रोग गाई म्हशींना विषाणूमुळे होतो. या रोगात गाई ,म्हशींच्या त्वचेवर १ ते ५ सेंटिमीटर व्यासाच्या गाठी येतात. चावणा-या माशा डास गोचीड ,किटक चिलटे इ.बाह्य परोपजीवी या रोगाचा मुख्यत्वे प्रसार करतात.
बाधित जनावर साधारण २ ते ५ आठवडे लंपी त्वचा रोगाची कोणतीही बाह्य लक्षणे दाखवत नाही .याला रोगाचा सुप्त काळ म्हणतात. या आजारात जनावरास प्रथम तीव्र स्वरूपाचा ताप येतो त्यानंतर डोळ्यातून अश्रू व नकातून स्राव सुरू होतात. लसीका ग्रंथींना सूज येते. जनावरांची भूक व तहान मंदावत जाते. व दुग्ध उत्पादन कमी होते.डोके, मान ,पाय ,छाती, पाठ ,मायांग , कास इत्यादी भागावरील त्वचेवर हळू हळू १ ते ५ सेंटिमीटर व्यासाच्या गाठी येतात. काही वेळा तोंडात,नाकात व डोळ्यात व्रण येतात. तोंडातील व्रणांमुळे जनावरास चारा चघळण्यास व रवंथ करण्यास त्रास होतो. डोळ्यांतील व्रणांमुळे चिपडे येवून पापण्या चिकटून  दृष्टी बाधित होते. या आजारात जनावराला फुफ्फुसदाह ,स्तनदाह देखील होतो. फुफ्फुसदाहामुळे जनावराला श्वसनास त्रास होतो. व धाप लागते. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते ही लंपी स्कीन डिसीज्  आजाराची लक्षणे असून लंपी स्किन त्वचा आजाराची लक्षणे दाखविणारे जनावर दिसून आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय संपर्क साधून जनावरावर उपचार करून घ्यावेत. पशुवैद्यकाकडून ज्वर नाशक ,सूज कमी होणारे, व वेदनानाशक औषध जनावरास टोचून घ्यावे, जनावरास जिवाणूजन्य रोगाचा दुय्यम संसर्ग होवू नये म्हणून पशुवैद्यकाकडून प्रतिजैवक औषध टोचून घ्यावे, त्वचेवरील गाठीचे जखमेत रूपांतर झाल्यास जखमेत अळ्या पडू नयेत म्हणून पशुवैद्यकाकडून औषधोपचार करून घ्यावेत व जखमेवर मलम लावावे असे आवाहन शिरूर पंचायत समितीचे पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ.नवनाथ पडवळ यांनी केले आहे.

Share This

titwala-news

Advertisement