• Total Visitor ( 133255 )

स्व.यशवंतराव चव्हाण यांची जयंती शिरूरमध्ये साजरी

Raju Tapal March 15, 2023 94

स्व.यशवंतराव चव्हाण यांची जयंती शिरूरमध्ये साजरी
         -------------------
माजी उपपंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण या़्ंची जयंती  रविवार दि.१२ मार्च २०२३ रोजी सकाळी साडेनऊ वाजता शिरूरमध्ये साजरी करण्यात आली. 
स्व.यशवंतराव चव्हाण सामाजिक,शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुस्लीम जमात संघटनेचे अध्यक्ष इक्बालभाई सौदागर ,लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष रविंद्र धनक यांच्या हस्ते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस  पुष्पहार घालण्यात आला.
यशवंतराव चव्हाणसाहेब अमर रहे, अमर रहे,भारत माता की जय अशा घोषणा यावेळी उपस्थितांकडून देण्यात आल्या. 
घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक धरमचंद फुलफगर,माधव सेनेचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रबापू सानप, डॉ.सुभाष गवारी, ऍड. प्रदीप बारवकर, यशवंतराव चव्हाण सामाजिक,शैक्षणिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर, मंगेश खांडरे, संतोष गादिया, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, रविराज लेंडे, निलेश खाबिया,  योगेश जामदार, पंढरीनाथ शेजवळ ,कार्याध्यक्ष बाळासाहेब घाडगे ,माधव मुंडे कार्यक्रमास उपस्थित होते. 
शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन बारवकर, टिटवाळा न्यूज,मराठी 1 न्यूज चे प्रतिनिधी,पत्रकार विजय ढमढेरे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, निलेश खाबिया यांना रविंद्रबापू सानप यांच्या हस्ते ना.धो.महानोर लिखित 'यशवंतराव चव्हाण' हे पुस्तक यावेळी देण्यात आले.
यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री म्हणून ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या शेतकरी,कष्टकरी ,कामगार,व्यापारी ,सगळ्यांच्या हिताची कामे व्हावीत यासाठी त्यावेळी काम केले,नेतृत्व केल्याचे सामाजिक ,शैक्षणिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर यांनी यावेळी प्रास्ताविकात सांगितले.
रविंद्रबापू सानप यावेळी बोलताना म्हणाले, चव्हाणसाहेबांनी सामाजिक दिशा महाराष्ट्राला दिली.सामान्य,गरीब माणसापर्यंत अगदी गावपातळीपर्यंत हक्क आणि अधिकार त्यांना मिळावेत म्हणून पंचायतराज कायदा आणला आणि राबविला म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांचे उपकार आपल्या पिढ्यानपिढ्यांवर आहेत.
लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष रविंद्र धनक यावेळी बोलताना म्हणाले, सहकाराचं मॉडेल फार आग्रहपूर्वक यशवंतराव चव्हाणांनी रूजवलं.चांगला मार्ग दाखविणारं नेतृत्व यशवंतरावांचं होतं. यशवंतराव चव्हाणांना दिल्लीला जावे लागले. यशवंतराव चव्हाण यांच्या हातात अजून ५ वर्षे महाराष्ट्र राहिला असता तर अजून वेगळी जडणघडण झाली असती. यशवंतरावांना विचारले, राज्य मराठ्यांचे की मराठा समाजाचे? यशवंतराव म्हणाले, राज्य मराठी माणसांचे ! समाजाच्या सामुदायिक शहाणपणावर विश्वास ठेवा ही शिकवण यशवंतरावांनी दिली. यशवंतराव चव्हाण असते तर सहकारी चळवळीचा महाराष्ट्र उभा राहिला असता.भावी पिढीचं भवितव्य आपल्याला चांगलं राखायचं असेल तर जाती,धर्म, पक्ष, पंथ लिंग भेदाच्या पलिकडे जावून आपल्याला माणूस म्हणून एकत्र आले पाहिजे. माणुसकीची ,एकतेची गुढी उभारली पाहिजे असे आवाहन रविंद्र धनक यांनी यावेळी केले.
डॉ.सुभाष गवारी यावेळी बोलताना म्हणाले ,यशवंतराव चव्हाणांसारखा सुसंस्कृत ,विद्वान, सुशिक्षित नेता या महाराष्ट्राला लाभला. शेतक-याला त्याची प्रगती कशी होईल ,त्याच्यासाठी कोणती धोरणे राबविता येतील हा विचार त्यांनी केला. सहकाराची चळवळ आणली. साखर कारखाने त्यांनी उभे केले. कुठली राजकीय पार्श्वभूमी ,सरंजामी, जहागिरदारी,पाटीलकी यशवंतरावांकडे असे काहीही नव्हते. मित्रांच्या मदतीवर कोल्हापूरला जावून बी.ए.झाले. पुढे एल एल बी.चे शिक्षण घेतले. अशा सुसंस्कृत पार्श्वभूमीमध्ये असलेला सुसंस्कृत नेता या महाराष्ट्राला लाभला.
माधव मुंडे यांनी आभार मानले.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे 
     शिरूर जि.पुणे 8975598628

Share This

titwala-news

Advertisement