लातूर शहर, परिसरातून चोरीस गेलेल्या ११ दुचाक्या जप्त
लातूर शहर व परिसरातून चोरीस गेलेल्या ११ दुचाक्या स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी जप्त केल्या. याप्रकरणी रोहित सुभाष अलगुडे खाडगाव रोड लातूर सध्या रा. भैय्याचे रान भीमनगर कुर्डूवाडी या आरोपीला शिवाजीनगर लातूर पोलीसांनी अटक केली.
आरोपीकडून ३ लाख ४८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सहाय्यक फौजदार संजू भोसले, संपत फड, चंद्रकांत डांगे, बंटी गायकवाड, सिद्धेश्वर जाधव, प्रदीप चोपणे या पोलीसांनी ही कामगिरी केली.