• Total Visitor ( 447710 )
News photo

राज्यभरातील वकिलांची काळ्या कोटापासून‌ ३ महिने सुटका

Raju Tapal publisher March 24, 2026 29

राज्यभरातील वकिलांची काळ्या कोटापासून‌ ३ महिने सुटका

  

शिक्रापूर :-  राज्यभरातील वकिलांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेचा विचार करून न्यायालयीन कामकाजा दरम्यान काळा कोट घालण्याची सक्ती हटविण्यात आली आहे. ही सवलत १५ मार्च ते १५ जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहाणार आहे. उन्हाळ्यात उष्णतेचे तापमान खूप वाढत असल्याने वकिलांना काळा कोट परिधान करणे त्रासदायक ठरत असते.काळा रंग उष्णता शोषून घेत असल्याने उकाडा अधिक जाणवतो.न्यायालयीन कामकाज करताना अडचणी निर्माण होतात.ग्रामीण भागातील न्यायालयांमध्ये पंखे,कुलर किंवा ए सी सारख्या सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने वकिलांना काम करताना अधिक त्रास होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या बातमीस तरूण भारत नागपूर आवृत्तीने प्रसिद्धी दिली आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement