प्रा.संतोष वीरकर यांच्या व्याख्यानाचे तळेगाव ढमढेरेत आयोजन
प्रा.आशुतोष विलासराव ढमढेरे यांना सत्यशोधक डाॅ.हरी नरके पुरस्कार जाहीर
विजय ढमढेरे
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- फुले,शाहू, आंबेडकर विचारांच्या पुरोगामी चळवळीचा योद्धा, ख्यातनाम विचारवंत, सामाजिक विषयांचे अभ्यासक प्रा.हरी नरके यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील श्री.संत शिरोमणी सावता महाराज मंगल कार्यालय याठिकाणी शनिवार दि.९ आॅगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता छत्रपती संभाजीनगर येथील प्रा.संतोष वीरकर यांचे महात्मा फुले चरित्र व समग्र साहित्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे गावच्या सरपंच स्वातीताई लांडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शिक्रापूर गावच्या उपसरपंच वंदनाताई भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक कार्यातील विशेष योगदानाबद्दल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विचार मंचाच्या वतीने प्रा.आशुतोष विलासराव ढमढेरे यांना सत्यशोधक डाॅ.हरी नरके पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विचार मंच तसेच तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.