• Total Visitor ( 133364 )

डॉ.जगन्नाथ दिक्षित यांनी दिल्या जीवनशैली बदलण्याच्या टिप्स

Raju tapal December 28, 2024 54

डॉ.जगन्नाथ दिक्षित यांनी दिल्या जीवनशैली बदलण्याच्या टिप्स

गणेश जाधव मदत फाऊंडेशन रामबाग सिंडिकेट कल्याण यांच्या वतीने व माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका विणाताई जाधव यांच्या माध्यमातून तसेच विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ,रामबाग जेष्ठ नागरिक संघ,राणी लक्ष्मीबाई जेष्ठ नागरिक संघ,रामबाग ऑनर्स असोसिएशनचे यांच्या सहकार्याने दिनांक  27 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत व्याख्यान माला कार्यक्रमाचे आयोजन नुतन विधालयाच्या पटांगणात करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून व्याख्यान मालेची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका विणाताई जाधव यांच्या हस्ते उपस्थित पाहुणे याचा सन्मान करण्यात आला.
व्याख्यान मालेचे प्रथम पुष्प 27 डिसेंबर रोजी डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी आजच्या फास्टफूडच्या काळात जिवनावर होणारे दुष्परिणाम व त्याच्या पासून दुर राहण्यासाठी योग्य तो आहार,औषधाविना मधुमेह नियंत्रणात आणणे या विषयावर नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की डायबेटीस प्रमाण खुप वाढले आहे याला कारण आपणच आहोत परंतु घाबरून जाउ नये, औषध न घेता फरक पडतो परंतु आपण पथ्य पाळले पाहिजेत,आपली जीवनशैली बदलायची असेल तर आपण खाण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे, दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे, दररोज पाच किलोमीटर चालले पाहिजे तसेच, थंड पेय व गोड वस्तू पासुन दुर राहिले पाहिजे, लठ्ठपणा व पोट वाढते अशा व्यक्तीनी दिवसातून फक्त दोन वेळा जेवण केले पाहिजे व ते हि वेळेवर तसेच शालेय मुलांमध्ये हि लठ्ठपणा वाढला आहे यासाठी पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे आपण गोड वस्तू किवा थंड पेय पितो ते मुलांना देतो हळुहळु त्यांना हि सवय लावतो मग त्याचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. लठ्ठ मुलांनी दिवसातून पंधरा किलोमीटरवर सायकल चालवणे गरजेचे आहे अशा अनेक टिप्स डॉ.जगन्नाथ दिक्षित यांनी दिल्या, तसेच यावेळी उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले,
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोर दिवटे यांनी केले,
कार्यक्रमाला कल्याण परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This

titwala-news

Advertisement