साहित्यिक हा समाज जीवनाचा आरसा:डॉ. संदीप सांगळे
शिरूर :- कवी, लेखक जेव्हा अस्वस्थ होतो तेव्हा त्याच्या लिखाणातून समाजाचे दुःख, वेदना व्यक्त होत असतात. त्यामुळे साहित्यिक अस्वस्थ झाले तरच सकस साहित्याची निर्मिती होईल. कवी लेखक यांचे सामाजिक परिवर्तनात मोठे योगदान असून साहित्यिक हा समाज जीवनाचा आरसा आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.संदीप सांगळे यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणच्या वतीने रांजणगाव गणपती येथे उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्यातील एकूण दहा उत्कृष्ट साहित्यिकांचा सन्मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यामध्ये दिपक तांबोळी, लक्ष्मण दिवटे, दत्ता पाटील, कमलाकर राऊत, बाळकृष्ण बाचल, उत्तम सदाकाळ, गणेश भाकरे, प्रकाश बोधे,सुभा लोंढे, अलकनंदा घुगे, इत्यादी लेखकांचा सन्मान चिन्ह,रोख रक्कम,व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिरूर तालुक्यातील पाच साहित्यिकांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
यामध्ये, संभाजी शिवलें, शंकर न-हे, दत्तात्रय जगताप, दादाभाऊ गावडे, रुपाली भोरकडे या पाच साहित्यिकांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मांडवगण फराटा येथील प्रसिद्ध कावीळ तज्ज्ञ डॉ.धनंजय शिंदे होते.
ज्येष्ठ प्रबोधनकार उत्तम आण्णा भोंडवे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. संदीप सांगळे हे उपस्थित होते.
ग्रंथ पुजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिरुर ग्रामीणचे अध्यक्ष मनोहर परदेशी यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.कुंडलिक कदम यांनी केले. यावेळी मयुर करंजे, नानासाहेब गावडे, राहुल चातुर, सचिन बेंडभर,आकाश भोरडे, संभाजी चौधरी,बाबा इनामदार, गुरुनाथ पाटील, विठ्ठल वळसे, शेखर फराटे, बाळासाहेब फराटे, पांडुरंग बाणखिले, डॉ हेमंत दातखिळे, प्राचार्य जगदाळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.विवेकानंद फंड यांनी आभार मानले.