अवैधपणे गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी लोणंद पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात १ लाख ८६ हजार रूपये किंमतीचा साठा जप्त करून एका संशयितास ताब्यात घेण्याची कारवाई केली.
सागर नाथाजी शिंदे रा.लोणंद असे याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
लोणंद येथील गोटेमाळ परिसरात अवैधरित्या गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल के वायकर यांनी याबाबतची माहिती फलटण येथील उप अधिक्षक तानाजी बरडे यांना देवून अन्न औषध प्रशासनाशी संपर्क करून त्यांना बोलावून घेत पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त अधिक्षक अजित बो-हाडे, तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी ,कर्मचारी, लोणंद पोलीसांनी संयुक्तपणे छापा टाकून बंदी असलेला १ लाख ८६ हजार रूपये किंमतीचा गुटखा जप्त करण्याची कारवाई केली.