• Total Visitor ( 502449 )
News photo

कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्ग टोकावडे येथे वाहनांच्या लांबच रांगा प्रवासी नागरिक संतप्त,

Raju tapal October 16, 2025 87

कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्ग टोकावडे येथे वाहनांच्या लांबच रांगा प्रवासी नागरिक संतप्त,



 टोकावडे नाक्यावरील दोन्ही बाजूला खोदून ठेवलेले असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्गाचे काम कल्याण पासून ते माळशेज पर्यंत चालू असताना, काही ठिकाणी जास्त प्रमाणात माती चिखल असल्याने दुचाकी स्वरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, मानिवळी ते टोकावडे, दोन्ही लेन एकाच बाजूने वाहतूक सुरु आसल्याने,वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागते,दीपावली सण अगदी जवळ आल्या मुले टोकावडे येथे,दोन्ही लेन एकाच बाजूने चालू राहिल्या तर वाहनांचा अपघात होण्याची दाट श्यक्यता दिसून येते,टोकावडे बाजार पेठ आसल्याने या बाजारपेठेत सणासुदीला खरेदी साठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते,रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे टोकावडे बाजारपेठेत, व्यापारी वर्गाला मोठा नुकसान होण्याची श्यक्यता आहे,या महामार्गाचे काम लवकर पूर्ण करावे अशी परिसरातील नागरिक मागणी करत आहेत,

राजेश भांगे ठाणे

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement