अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली.
ते मशीन घेवून जात असताना गस्तीवर असलेल्या पोलीसांच्या वाहनाचा सायरन वाजल्याने ३ ते ४ चोरट्यांनी ए टी एम रस्त्यातच टाकून पळ काढला.
विश्वास पोपट कसबे यांनी याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
लोणी व्यंकनाथ गावात चार पाच चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम फोडून मशीन चोरी केली. गस्तीवर असणा-या श्रीगोंदा पोलीसांच्या सायरन वाजल्याने ए टी एम मशीनमधील २५ लाख ९९ हजार रूपयांची रोकड वाचली.
श्रीगोंदा पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत एका संशयितास ताब्यात घेतले. चोरट्यांनी ए टी एम रूममधील ,बाहेरील, स्टेट बँकेच्या बाहेरील असे तीन सी सी टी व्ही चोरून नेले आहेत. ए टी एम , एटीएम च्या रूमच्या दरवाजाची तोडफोड केली.
पोलीस उपअधिक्षक अण्णा जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी घटनास्थळी भेट दिली.