माधुरी 'हत्तीण' पुन्हा नांदणी मठात येणार;
वनतारा सकारात्मक;
कोल्हापूरकरांच्या लढ्याचा विजय
कोल्हापूर :- आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. वनताराचे साईओ विहान कर्णीक आणि नांदणी मठाचे मठाधिपती यांची बैठक पार पडली. या बैठकीत महादेवी हत्तीणीला परत कोल्हापुरात नांदणी मठात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूरकरांचा हा मोठा विजय आहे. महाराणी हत्तीणीला परत नांदणी मठात पाठवण्यात यावं यासाठी कोल्हापूरकर प्रचंड आक्रमक झाले होते. कोल्हापूरकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावरही पदयात्रा काढली होती. कोल्हापूरकरांच्या माधुरीप्रती असणाऱ्या भावना पाहता वनताराने माधुरी हत्तीणीला परत नांदणी मठात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूरवासियांच्या भावना दुखवण्याचा कोणताही उद्देश नव्हता, नांदणी मठाची माधुरी हत्तीण ही लवकरात लवकर कोल्हापुरात परतणार, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा शब्द वनताराच्या अधिकाऱ्यांनी दिला. नांदणी मठामध्ये माधुरीसाठी एक मदत पुनर्वसन केंद्र उभारणार असल्याचंही वनताराच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच माधुरीला परत आणण्यासाठी न्यायालयाकडे आवश्यक तो पत्रव्यवहार करू असंही वनताराकडून स्पष्ट करण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्यात आलं आहे. मात्र स्थानिक जनतेच्या मागणीनुसार हत्तीणीला परत पाठवण्याबद्दल वनतारानं सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या संबंधी नांदणी मठाधिपती आणि वनताराच्या अधिकाऱ्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली.
माधुरी हत्तीणीला नांदणी मठामध्ये परत पाठवण्यासंबंधी सर्व ती प्रक्रिया करणार, त्यासाठी अत्यावश्यक सर्व पत्रव्यवहार करणार असल्याचं वनताराचे सीईओ विहान करनी यांनी सांगितलं. वनतारा, सरकार आणि नांदणी मठाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नांदणी मठामध्ये माधुरीसाठी सर्व त्या सुविधा निर्माण करण्यात येतील आणि नंतर माधुरीला परत पाठवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नांदणी मठातील महाराणी हत्तीणीच्या विषयी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. वन्य प्राण्यांचा नियमांचा विचार करुन काही गोष्टी सुप्रीम कोर्टात मांडण्यात आल्या होत्या. तसेच महाराणी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात सुप्रीम कोर्टाने अनुमती दिली होती. त्यानुसार वनताराकडून महाराणी हत्तीणीला नेण्यात आलं होतं. महाराणी ज्या दिवशी नांदणी मठ सोडून गेली त्यादिवशी तिच्यादेखील डोळ्यांत पाणी होतं. तसेच या हत्तीणीसोबत कोल्हापूरकरांच्या भावना आहेत.