मध्य रेल्वे च्या आसनगाव स्थानकाला समस्यांचा विळखा
Raju Tapal
February 12, 2022
59
मध्य रेल्वे च्या आसनगाव स्थानकाला समस्यांचा विळखा
आसनगाव स्थानकातील समस्या सुटणार केव्हा..रेल्वे संघटनेची विचारणा
लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने मतदार राजाचे हाल..!
कल्याण कसारा मार्गांवर आसनगाव स्थानक एक. महत्त्वाचं स्थानक म्हणून ओळखलं जातं.. शहापूर तालुक्यातील हजारो रेल्वे प्रवासी रोज या स्थानका मधून लोकल प्रवास करत असतात..
या आसनगाव स्थानकात पूर्वेकडे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या अधिकच जटिल बनत चालली आहे.
या समस्याबाबत कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन ने समस्याचा जणू पाढा वाचला आहे आणि लोकप्रतिनिधी ना याबाबतीत गाऱ्हाणं घातलं आहे..
1)आसनगाव स्थानकात पूर्वेकडे ये-जा करणारी प्रवासी संख्या ही ८५% हुन अधिक आहे;त्यातच फक्त एकच पादचारी पूल(FOB) पूर्वेकडे उतरत आहे. लोकल आसनगाव स्थानकात आली असता पूर्वेकडे प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाश्यांना लोकल पकडणं अत्यंत जिकरीचे होत आहे. पूर्वेकडे कसारा दिशेला FOB व्हावा.
२)लोकल संख्या अपुरी असल्याने दोन लोकल मधील अंतर हा ४० मिनिटांहुन अधिक आहे.हा गॅप कमी व्हावा.
३) रिक्षा उभ्या करायला रिक्षा स्टँड नाही, जागा कमी आहे त्यातच रिक्षा चालक एकमेकांच्यापुढे निघण्यासाठी अतिघाई करत असल्याने वाहतूक नियोजन होण्यास अडथळे निर्माण होतात.
४) रिक्षा चालकांना खरोखरच कौन्सलिंगची आवश्यकता आहे. RTO ने नियोजनबद्धता आणि नियम याबाबत लक्ष घालावे.
*५) गर्दीचे नियोजन होण्यासाठी पूर्वेकडील रेल्वेच्या आखत्यारीतील पडीक जागा वापरात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
आसनगाव-शहापूर रस्त्यांची आणि मूलभूत सुविधांची उणीव नाहीशी करण्यासाठी स्थानिक आमदार आणि खासदार साहेबांनी प्रयत्न न करणं हे निराशाजनक आहे.
तरी आमदार, खासदार महोदयांनी समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी समर्थकांनी आणि पक्षीय नेते,कार्यकर्त्यांनी सदर समस्या निदर्शनास आणून द्यावी.
सदर समस्या गंभीर असून भविष्यात लोकल प्रवासी आणि रेल्वे संघटना संतप्त होऊन आंदोलनाचा पवित्रा हाती घेऊ शकतील असे सूतोवाच कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर संघटनेचे सचिव उमेश विशे यांनी केले आहे..
Share This