• Total Visitor ( 84571 )

महादेव मंदीर कलशारोहण सभामंडप लोकार्पण सोहळा संपन्न

Raju Tapal February 15, 2022 50

कोंढापुरी ता.शिरूर येथील महादेव मंदीर पुरातन गोल घुमट मंदीराचा प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण सभामंडप लोकार्पण सोहळा संपन्न
 
शिरूर हवेली तालुक्याचे आमदार ,ऍड अशोकबापू पवार यांनी दिलेल्या आमदार निधीतून तसेच ग्रामस्थांनी दिलेल्या लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पुरातन गोल घुमट ,महादेव मंदीराच्या जिर्णोद्धार सोहळ्यानिमित्त आयोजित केलेला कलशारोहण, मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना व सभामंडप लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
 आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक शांतीब्रम्ह गुरूवर्य ह.भ.प. मारूती महाराज कु-हेकर , गुरूवर्य ह.भ.प. माणिक महाराज शास्त्री मुखेकर यांच्या हस्ते प्रमुख उपस्थितीत कलश स्थापना, कलशारोहण सोहळा पार पडला.
महादेव मंदीराच्या  कलशारोहण, प्राणप्रतिष्ठापना, व सभामंडप लोकार्पण सोहळ्यानिमित्त  रविवार दि.१३/२/२०२२ रोजी  सकाळी साडेअकरा वाजता हभ.प.जालिंदर महाराज भोसले,ह.भ.प. प्रल्हाद महाराज टकले यांच्या उपस्थितीत   गावातील रस्त्यावरून भगवे झेंडे, टाळ मृदंगाच्या गजरात, गोपाल कृष्ण राधाकृष्ण, ज्ञानबा तुकाराम असा जयघोष करत श्रींच्या मुर्तींची मिरवणूक काढण्यात आली होती.
माजी सरपंच स्वप्निल अरूणराव गायकवाड, उद्योजक डी. एल नाना गायकवाड यांच्या हस्ते राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
रविवारी दुपारी २ वाजता रांजणगाव गणपती येथील दिवाकर गुरूजी यांच्या उपस्थितीत पुण्याहवाचन, मातृका, नांदिश्रा हदाही आर्याय वर्णी, श्री जलाधिवास हे कार्यक्रम ग्रामस्थांच्या उपस्थितीत  पार पडले.
सोमवारी दि.१४/२/२०२२ रोजी आऴदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे  अध्यापक  ह.भ.प. मारूती महाराज कु-हेकर , माणिक महाराज शास्त्री मुखेकर ,माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, उद्योजक डी.एल नाना गायकवाड ,विनयशेठ गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य देवता हवन, कलशस्थापना, कलशारोहण कार्यक्रम पार पडला.
सरपंच संदीपराव डोमाळे, उपसरपंच सुजाता गायकवाड, उद्योजक अजयशेठ गायकवाड, मध्य महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष धनंजयराव गायकवाड,  ग्रामपंचायत सदस्य राहुल दिघे,सुनील जयसिंगराव  गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या अपेक्षा गायकवाड, सुषमा गायकवाड , विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब बापुराव गायकवाड, शांताराम गायकवाड , प्रकाश घाडगे,दीपक संपतराव गायकवाड,  सामाजिक कार्यकर्ते सुरेशबापू गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य अमर गायकवाड, योगेश गायकवाड, उद्योजक नितीन सुरेशराव गायकवाड,  माजी उपसरपंच माणिकराव गायकवाड, तटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष मधुकर जगनराव गायकवाड, पत्रकार विजयराव ढमढेरे ,
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी नामदेवराव गायकवाड,शिवसेनेचे शाखाध्यक्ष धनंजय गायकवाड, सेवानिवृत्त शिक्षक राजाराम विठ्ठलराव गायकवाड, भुजंगराव गायकवाड, दिलीपराव गायकवाड ,  सुभाषराव पलांडे,कांताराम घाडगे, सर्जेराव धोंडीबा गायकवाड, बाळकृष्ण गायकवाड, राजेंद्र सर्जेराव गायकवाड , उमेश दरवडे, संजय दोरगे, आर टी गायकवाड, सुरेशराव गोंटे, विलासराव चव्हाण आदींसह कवठीमळा, खंडाळे, कासारी, डोमाळे वस्ती, रणसिंगमळा,टेमघर पुनर्वसन, गणेगाव खालसा, बुरूंजवाडी येथील ग्रामस्थांसह कोंढापुरीचे ग्रामस्थ व महिला, भाविक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी २ वाजल्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप झाला. ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Share This

titwala-news

Advertisement