विश्वरत्न बोधिसत्व महामानव परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महा
परिनिर्वाण दिनानिमित्ताने महा कर्मभूमी बुद्ध
नाशिक रोड या ठिकाणी सामूहिक बुद्ध वंदना घेऊन नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच महापरिवर्तन दिनानिमित्त रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथे गोरगरिबांना अन्नदान देखील करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संचलन सचिन देशमुख, बंटी थोरात, आकाश जगताप, शालिकराम बनसोडे, अमोल साळवे, चंदू वाघ, सत्यजित चव्हाण, देवा साळवे, आणि अमोल झारे आदी वैचारिक मित्र उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील ब्राह्मणगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महा परिवर्तन दिनानिमित्त विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व पुतळ्यास अभिवादन करताना रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बापू राज खरे सोबत इतर मान्यवर उपस्थित होते.