शिरूर तालुक्यातील काठापूर खूर्द येथील हनूमान मंदीर मठामध्ये शिरूर पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात मठातील महारांकडे १० किलो गांजा ,१४ गांजाची झाडे असा ४१ किलो ४४५ ग्रॅम गांजा ,एक सांबर जातीच्या हरणाचे कातडे व तीन शिंगे असा एकूण २ लाख ५७ हजार २२२ रूपयांचा ऐवज जप्त केला.
याप्रकरणी शांताराम बाबुराव ढोबळे उर्फ बापू महाराज वय -५३ वर्षे रा.हनुमान मंदिर मठ, काठापूर खूर्द ता.शिरूर मूळ रा. पारगाव ता.आंबेगाव जि.पुणे असे अटक करण्यात आलेल्या मठातील तथाकथित महाराजाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गिते, पोलीस नाईक नितीन सुद्रीक, निलखंठ कारखेले, नाथसाहेब जगताप, बाळू भवर या पोलीस पथकाने सापळा रचून काठापूर खूर्द येथील हनुमान मंदीर मठामध्ये छापा टाकला असता त्याठिकाणी मठ चालविणारा शांताराम बाबूराव ढोबळे उर्फ बापू महाराज याला ताब्यात घेवून त्याच्या मठात राहात असलेल्या ठिकाणाहून १० किलो तयार गा़ंजा, मठाच्या वरांड्यात,मठाच्या अवतीभोवती लावलेली गांजाची ३१ किलो ४४५ ग्रॅम वजनाची १४ झाडे असा एकूण ४१ किलो ४४५ ग्रॅम वजनाचा गांजा त्याठिकाणी लपवून ठेवलेले ३ नग सांबर जातीच्या प्राण्याची शिंगे व कातडे असा एकूण २ लाख ५७ हजार २२५ रूपये किंमतीचा ऐवज
आरोपी शांताराम बाबुराव ढोबळे उर्फ बापू महाराज माच्या विरूद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ८९९/२१ एन डी पी एस कायदा कलम ८ क २०,२२ वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ ( १६ )९,३९,४८ ए ४९ बी ५१,५२ अनुसूची ३ मधील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत पुढील तपास करीत आहेत.
जप्त केला.