अमरावती जिल्हा परिषद मध्ये महाराणा प्रताप यांची जयंती साजरी
अमरावती दि.२९ :- आज डाॅ.पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद अमरावती येथे संजीता महापात्र भाप्रसे),मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अमरावती यांचे शुभहस्ते महाराणा प्रताप यांचे प्रतिमेचे पुजन करुन हारार्पण करण्यात आले.
बालासाहेब बायस साहेब,उप-मुख्य कार्यकारी अधिकारी ,हेमंत ठाकरे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी जिप अमरावती आणि सुनिल जाधव कार्यकारी अभियंता,जि.प.लघुपाटबंधारे/ग्रापापू विभाग अमरावती यांचे शुभहस्ते प्रतिमेला हारार्पण करुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मा. बालासाहेब बायस -उप-मुख्य कार्यकारी अधिकारी जिप अमरावती यांनी तसेच वनिता शिंदे-प्रसिद्धी अधिकारी -आरोग्य विभाग जिप अमरावती यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनशैली व शुरविरतेबाबत आपल्या भाषणांत सभागृहात अवगत केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर घाटे-स्वीय सहाय्यक यांनी केले.
या कार्यक्रमाला राजेश रोंघे,पंकज गुल्हाने, श्रीकांत मेश्राम,लिलाधर नांदे,विनोद बुटे,निलिमा भांगे,अर्चना लाहुडकर,परमेश्वर राठोड,हेमंतकुमार यावले,विशाल विघे,सतिश पवार,सुजित गावंडे,जीवन नारे,निशांत तायडे,दत्ता रणखांब, प्रतिक काळे,अपर्णा आत्राम,प्रिती दिवाण,दिपा गजघाटे,पुनम फुलंबरकर,पुष्पा तागड इत्यादी जिप चे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने जिप सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित होते.